Ad will apear here
Next
अध्यक्षपदी सुनील गायकवाड, तर सचिवपदी जयश्री पाटील
कोल्हापूर : ‘लायन्स क्लब कोल्हापूर’च्या अध्यक्षपदी सुनील गायकवाड यांची, तर सचिवपदी जयश्री पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच संजय कांबळे यांची खजिनदारपदी निवड झाली. त्यांच्याबरोबर इतर पदाधिकाऱ्यांनाही या वेळी शपथ देण्यात आली.

हा क्लब १९५६मध्ये स्थापन झाला असून, देशातील तिसरा व सर्वांत जुना क्लब आहे. ‘या क्लबने समाजासाठी अनेक कामे केली आहेत. अशा क्लबच्या शपथग्रहण समारंभास प्रमुख अतिथी म्हणून येण्याचा योग मला आला, हे माझे परमभाग्य आहे,’ असे मत वासुदेव कलघटगी यांनी व्यक्त केले. ते लायन्स क्लब कोल्हापूरच्या पदग्रहण व शपथविधी कार्यक्रमावेळी बोलत होते.

या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी केले. मनोहर शर्मा यांनी शपथ देऊन त्यांचा सन्मान केला. मावळते अध्यक्ष तानाजी चौगुले यांनी अध्यक्षीय, तर सुनील गायकवाड यांनी सेकेटरीपदाची धुरा सांभाळताना केलेल्या कार्याचा आढावा घेतला. जयश्री पाटील यांनी खजिनदार म्हणून केलेले कार्य, तसेच ट्रस्टची उभारणी याविषयी सांगितले.

मनोहर शर्मा, दीपक मोहोळकर, दादासाहेब पाटील, नार्वेकर, गुरुदेव पाटील, संध्या पाटील, तसेच क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. आभार पोपटराव माळी यांनी व्यक्त केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QYZFBE
 Congratulations to Lion Sunil Gaikwad and lion Jayashri Patil.
 Nice
 अभिनंदन all the best
 congrets all the best
 Wish you all the best
 लायन्स क्लब कोल्हापूर’च्या सचिवपदी मा जयश्री पाटील मॅडम यांची नियुक्ती झाले बद्दल हार्दिक अभिनंदन , त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
 Congratulations madam
 Nice
 Congrets and all the best from kurundwad lions.
 अभिनंदन ताई
 Well done. Congratulations. Go ahead.
 Superb
Similar Posts
‘डीकेटीई’ला ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट’ पुरस्कार प्रदान इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या ‘डीकेटीई’ संस्थेला वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये बेस्ट प्लेसमेंट अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ‘डीकेटीई’च्या वतीने एमबीए विभागप्रमुख प्रा. एस. आर. पाटील यांनी डॉ. रवी गुप्ता आणि कमिशनर डॉ
कमला महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण कोल्हापूर  : पन्नास कोटी वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणी कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर’च्या सहकार्याने येथील कमला महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले. या वेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, रोटरीचे
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षपदी क्षीरसागर कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर शहरातील श्री अंबाबाई देवीच्या देवस्थानासह पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे तीन हजार ६७ मंदिरांचे व्यवस्थापन १९६९पासून महाराष्ट्र शासनाची ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’ पाहते. या देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर
पाककला स्पर्धेचे बक्षीस वितरण कोल्हापूर: ‘लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर’ यांच्यातर्फे पाककला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या वेळी लायन्स क्लबचे उपप्रांतपाल लायन वासुदेव कलगटगी म्हणाले, ‘‘लायन्स क्लब कोल्हापूर’ हा देशातील तिसरा आणि सर्वांत जुना क्लब असून, सातत्याने नवे उपक्रम राबवले जात आहेत. पावसाळ्यातील चटपटीत पदार्थ आणि

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language